संविधान धोक्यात ?
संविधान धोक्यात ? काही झाले तरी सत्ता हातची जाऊ द्यायची नाही, हेच तत्व आणि हातातून गेली तरी आपल्या पै पाहुण्याच्या हातात राहील हे धोरण या पलीकडे सध्या तरी काही दिसत नाही. खरे तर सर्वसामान्य जनतेने जे बिचारे एकदा मतदान करतात आणि चार वर्ष 364 दिवस गप गुमान राहतात त्यांनीच घटना धोक्यात आली असे म्हणणे महत्त्वाचे आहे आणि बाबासाहेबांनाही ते नक्कीच पटणारे असेल . महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दाखल होणार आहेत. भारताची शासन व्यवस्था लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित आहे. ही मूल्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तिच्या स्वातंत्र्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. कोणी कोणत्या पक्षात राहावे वा सोडून जावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आणि स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. त्यातच धैर्यशील मोहिते पाटील यांचाही जन्म 14 एप्रिल रोजी झाला असल्यामुळे ते या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यास सर्वाधिक योग्य आणि लायक उमेदवार ...