संविधान धोक्यात ?
संविधान धोक्यात ?
काही झाले तरी सत्ता हातची जाऊ द्यायची नाही, हेच तत्व आणि हातातून गेली तरी आपल्या पै पाहुण्याच्या हातात राहील हे धोरण या पलीकडे सध्या तरी काही दिसत नाही. खरे तर सर्वसामान्य जनतेने जे बिचारे एकदा मतदान करतात आणि चार वर्ष 364 दिवस गप गुमान राहतात त्यांनीच घटना धोक्यात आली असे म्हणणे महत्त्वाचे आहे आणि बाबासाहेबांनाही ते नक्कीच पटणारे असेल .

महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दाखल होणार आहेत. भारताची शासन व्यवस्था लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित आहे. ही मूल्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तिच्या स्वातंत्र्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. कोणी कोणत्या पक्षात राहावे वा सोडून जावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आणि स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. त्यातच धैर्यशील मोहिते पाटील यांचाही जन्म 14 एप्रिल रोजी झाला असल्यामुळे ते या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यास सर्वाधिक योग्य आणि लायक उमेदवार आहेत. सहाजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते राजीखुशीने प्रवेश करत आहेत. त्यांच्या प्रवेशाला शुभेच्छा . या त्यांच्या प्रवेशा बरोबरच भारतीय संविधान वाचवण्याचा मुद्दा विरोधकांकडून निवडणूक जाहीर झाल्यापासून जोरजोरात समोर आणला जात आहे. भारतीय जनता पक्षाने 400 जागांपेक्षा जास्त जागा मिळवण्याची दिलेली घोषणा ही संविधान बदलण्याकरता आहे असा मोठा भ्रम महाराष्ट्रात तरी सध्या केला जात आहे. हा भ्रमाचा फुगा फुगवण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार , त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार त्याचबरोबर शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे हवा भरत असतात. भारतीय जनता पक्षाला 400 जागा मिळू नयेत यासाठी त्यांनी प्रचार करणे सहाजिकच आहे. हा प्रचार त्यांच्या दृष्टीने योग्य असला तरी त्याची दुसरी बाजू म्हणजे त्यांना म्हणजेच भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना संसदेमध्ये बहुमत मिळवण्यासाठी जेवढ्या जागा आवश्यक आहेत तेवढ्या जागा नक्कीच मिळणार आणि मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्रिक करणार हे मान्य केल्यास जमा आहे. भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे पराभूत करून , आमची सत्ता येईल असे म्हणण्याचे धाडस ही मंडळी दाखवू शकत नाहीत. संविधान बदलण्याचा बागुलबुवा समोर उभा करत त्यांना 400 जागांच्या पुढे जाऊ देऊ नका असे आवाहन करताना शरद पवार आदि मंडळी पाहायला मिळतात.
संविधान बदलणे एवढे सोपे आहे का हा खरा प्रश्न आहे. त्यातून संविधान बदलणे म्हणजे काय स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांच्या पायावर उभे असलेले संविधान बदलणे आज तरी शक्य नाही आणि तसा प्रयत्न करण्यास भारतीय जनता पक्ष भरीसही पडणार नाही. संविधान आणि त्याची मूलभूत तत्वे कायम ठेवून त्या अनुषंगाने घटनांमध्ये दुरुस्ती करत राहणे हा प्रकार भारतीय जनता पक्ष यापुढे करत राहील असे दिसते. जसा 370 कलमासंदर्भात ज्या प्रकारे निर्णय घेतला गेला तसाच निर्णय समान नागरी कायद्याच्या बाबत घेतला जाईल, वा असे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर घटना दुरुस्तीच्या मार्गाने बदल केले जातील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसने व इतर पक्षांनीही आतापर्यंत 80 वेळा घटनेमध्ये दुरुस्ती केली आहे. घटना मध्ये दुरुस्ती होत राहणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही माहिती होते. बदल हा सृष्टीचा नियम असेल आणि शिक्षण, संस्कृती, तंत्र, तंत्रावर अधिष्ठित बुद्धिमत्ता, मानवी व्यवहार आणि हे व्यवहार करणारी सापेक्ष परिस्थिती यात बदल होणार असतील तर घटनेमध्ये दुरुस्ती ही करावीच लागणार आहे. आणि ती तशी होत राहील. यापूर्वी केली गेली होती. त्यामुळे घटना बदलणार आहे. संविधान वाचवले पाहिजे अशा प्रकारच्या एका ओळीच्या आणि सर्वसामान्यांना किंवा विशिष्ट वर्गाला भयभीत करून त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या विधानांचा बेलगाम वापर केला जात आहे. मुद्दा येतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू राष्ट्र या संकल्पनेचा अविष्कार भारतात भारतीय जनता पक्ष करेल या विचाराचा. यातही हिंदुराष्ट्र यातील हिंदू या शब्दापासून मतमतांतरे आहेत. त्यावर एक वाक्यता नसल्यामुळे नक्की हिंदू राष्ट्र म्हणजे काय याचा विचार केला जातो, तेव्हा पुन्हा एकदा ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांच्या विरोधात असणे म्हणजे हिंदू राष्ट्र असणे असे एक सरसकट विधान भारतीय जनता पक्ष याच्या विरोधात किंवा या विचारधारेच्या विरोधात केले जाते. भारताची राज्यघटना निधर्मी या तत्त्वावर आधारित असल्याने आणि अर्थात निधर्मी हा शब्दही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही हे मान्य केल्यावरही धार्मिक सलोखा असणे गरजेचे आहे, हे मान्य करत हा शब्द महत्त्वाचा ठरला आहे. त्या दृष्टीने सर्व धर्म समभाव हा निधर्मीपणाचा कणा म्हणून विचारात घेतला तर सर्वच धर्मीयांवर सरकारने समान दृष्टी ठेवली पाहिजे . असे झाले तर घटनादुरुस्ती व संविधान धोक्यात हा विषय निर्माण होणार नाही. मात्र आता कोणी कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि त्यामुळे आगा जे घडणार नाही त्यावरून मोठ्या प्रमाणात वाद, विवाद,मतभेद आणि मनभेद याची निर्मिती सुरू झाली आहे.
पुन्हा एकदा मूळ मुद्दा येतो तो संविधान धोक्यात आहे आणि घटना बदलली जाणार आहे असा कंठशोष करणाऱ्या विरोधकांच्या कृतीचा एकीकडे स्वातंत्र्य समता आणि बंधुता न्याय तत्त्वावर राज्याचा कारभार चालवण्याचे संविधानाप्रमाणे ठरवले जात असताना, ही मंडळी मतदारांना, सर्वसामान्यांना निवडणुकीत उमेदवारी करण्याचे स्वातंत्र्य देत नाहीत. आपल्याच भावकीत, नातेसंबंधात लोकसभा ते ग्रामपंचायतीच्या सरपंच पर्यंत पद आपल्या हातात कसे राहील याचा कडेकोट बंदोबस्त करत असतात. जे शरद पवार संविधान धोक्यात आले आहे असे म्हणतात आणि मोदी हे हुकूमशाह आणि पुतिन यांच्यासारखे काम करतात असे म्हणतात तेच धैर्यशील मोहिते पाटलांना आपल्या पक्षातून उभे करतात. याच मोहिते घराण्यात गेली 40 वर्षाहून अधिक काळ कारखान्यापासून ते लोकसभेपर्यंत सर्व सत्ता केंद्रित आहेत.

मोहिते पाटील आणि रामराजे यांना यांना रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात पाच वर्षात असा काय आकस निर्माण झाला आहे की, ज्या शरद पवारांना पराभूत करण्याचे मोहिते पाटलांनी ठरवले होते त्यांच पवार यांच्या पाया पडून उमेदवारी मिळवण्याचे त्यांनी ठरवले. त्यातूनही आपला एक नातेवाईक भारतीय जनता पक्षात आमदार आणि विरोधी पक्षातून दुसरा खासदारकी करता उभा करायचा हा प्रकार मवाळ लोकशाहीचा आहे असे शरद पवारांचे म्हणणे आहे का? तोच प्रकार एकनाथ खडसे यांच्या बाबतीत आहे. तर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घराण्याबाबतही हीच हुकूमशाही अधिष्ठित लोकशाही आपल्याला पाहायला मिळते. स्वतः भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर संजीवराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटामध्ये. याशिवाय अजून कोणाकोणाला कुठे कुठे पाठवू शकतात याचा अंदाज कदाचित त्यांनाच असू शकतो. तोच विषय बारामतीमध्ये.
ठिकाणी अशाच प्रकारची घराणेशाही आणि त्यातून निर्माण झालेली एकाधिकारशाही प्रत्यक्षात अमलात आणत असताना लोकशाहीची काळजी करायची, संविधान धोक्यात आहे असे सांगायचे हा या निवडणुकीतला मोठा विनोद झाला आहे. अर्थात लोकशाहीत प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. त्यामुळे राणा दांपत्यातील पत्नी एका पक्षात तर पत्नी दुसऱ्या पक्षात हेही पाहायला मिळत आहे. नणंद आणि भावजय विरोधात लढताना दिसतात . काही झाले तरी सत्ता हातची जाऊ द्यायची नाही, हेच तत्व आणि हातातून गेली तरी आपल्या पै पाहुण्याच्या हातात राहील हे धोरण या पलीकडे सध्या तरी काही दिसत नाही.
खरे तर सर्वसामान्य जनतेने जे बिचारे एकदा मतदान करतात आणि चार वर्ष 364 दिवस गप गुमान राहतात त्यांनीच घटना धोक्यात आली असे म्हणणे महत्त्वाचे आहे आणि बाबासाहेबांनाही ते नक्कीच पटणारे असेल .
मधुसूदन पतकी
14.04.2024
Comments
Post a Comment