Posts

संविधान धोक्यात ?

संविधान धोक्यात ?  काही झाले तरी सत्ता हातची जाऊ द्यायची नाही, हेच तत्व आणि हातातून गेली तरी आपल्या पै पाहुण्याच्या हातात राहील हे धोरण या पलीकडे सध्या तरी काही दिसत नाही.  खरे तर सर्वसामान्य जनतेने जे बिचारे एकदा मतदान करतात आणि चार वर्ष 364 दिवस गप गुमान राहतात त्यांनीच घटना धोक्यात आली असे म्हणणे महत्त्वाचे आहे आणि बाबासाहेबांनाही ते नक्कीच पटणारे असेल .  महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दाखल होणार आहेत.  भारताची शासन व्यवस्था लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित आहे. ही मूल्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तिच्या स्वातंत्र्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे.  कोणी कोणत्या पक्षात राहावे वा सोडून जावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आणि स्वातंत्र्याचा मुद्दा आहे.  त्यातच धैर्यशील मोहिते पाटील यांचाही जन्म 14 एप्रिल रोजी झाला असल्यामुळे ते या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यास सर्वाधिक योग्य आणि लायक उमेदवार ...

हम पांच

हम पाच  केंद्रात ठामपणे निवडून येणाऱ्या भाजप सारख्या पक्षालाच मतदान का करू नये असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सहाजिकच या चर्चेला उधाण आले तर .. पण सध्या जिल्ह्यातले पाच नेते पांडव एकत्र आलेत .हे हम पाच एकत्रित ताकदीने काय करू शकतील हे सांगायलाच नको.  सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. आरोप ,प्रत्यारोप त्याचबरोबर सभा ,मेळावे यांना जोर आला आहे. सभांमध्ये स्थानिक मुद्द्यां बरोबर राज्याचे आणि राष्ट्रीय मुद्दे जोरात समोर येत आहेत. वातावरण निर्मिती एनकेन प्रकाराने केली जात आहे. मात्र हा सगळा प्रकार पाहता गेल्या दोन दिवसांपासून महायुतीच्या प्रचाराला जोर आल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारण हम पाच हे आहे. कोणे एकेकाळी हम पाच ही टीव्ही सिरीयल गाजली होती. वेगवेगळ्या गुणवत्ता असणाऱ्या पाच मुली आणि त्यांचे आई, वडील असा या सिरीयलचा प्लॉट होता. निवडणुकीत या प्लॉटच्या नेमकी उलट परिस्थिती आहे. सिरीयल मध्ये पाच मुली काहीं ना काही घोटाळे करत असायच्या, आणि आई, वडील ते निस्तरायचे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ,पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई , ...

सुडाचा प्रवास

सुडाचा प्रवास  सुई हरवली आहे तिथेच ती शोधली पाहिजे. ती अंधारात हरवली असेल तर अंधारात शोधा. आपल्याला स्वच्छ प्रकाशात दिसते म्हणून प्रकाशात जाऊन तिथे शोधत बसला तर सुई सापडणार नाही. तेंव्हा अबकी बार कोणतेही सरकार आले तरी मतदारांशी गद्दार होऊ नका एवढेच या राजकीय खेळा नंतर सांगणे.त्यातून यापुढे वैयक्तिक कारणांमुळे सुडाच्या प्रवासाचा प्रारंभ कोणी करू नये ,त्याचा अंत सुड उगवण्यातच होतो. ...आणि अखेरीस लोकप्रतिनिधीच्या अपात्रते संदर्भातील निकाल बुधवारी लागला. या निकालानुसार शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचे विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले. तसेच दोन्ही पक्षाच्या कोणत्याच सदस्याला अपात्रही ठरवले नाही. सहाजिकच अपात्र  ठरवण्याकरता लढवल्या गेलेल्या या खटल्यात कोणीच अपात्र ठरले नसल्याने पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे. या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत त्याच बरोबर स्वतः उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यामुळे हे वातावरण अधिकाधिक गढूळ होण्यास...

उमेदवार निवडच अटीतटीचची

उमेदवारी ठरवणे अटीतटीचे महाराष्ट्रात  काँग्रेसने स्वबळाची भाषा केली तर त्याचा लाभ इंडिया आघाडीला होणार नाही, हे नक्की आहे. याचा फायदा भारतीय जनता पक्ष नक्कीच घेईल हेही पक्के आहे. अर्थात सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर निवडणूक अटीतटीची होण्यापेक्षा उमेदवारी ठरवणे हा मुद्दाच अधिक अटीतटीचा होईल, कळीचा होईल असे सध्या तरी वाटत आहे. सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींना जोरदार वेग आला आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या पत्रकार परिषदांमधून त्याचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचा दिनांक 14 जानेवारी रोजी महायुतीचा मोठा मेळावा ही घेण्यात येणार आहे. यामधून उमेदवारांच्या नावांची चाचपणी होण्याची दाट शक्यता नक्कीच आहे. अर्थात सर्वच पक्ष लोकशाही तत्त्वांना व धोरणांना अनुसरून चालत असले, तरी बऱ्याचशा गोष्टी पूर्वी निश्चित करून मग त्याला सामूहिक मान्यता मिळवली जाते. आणि अशा उलट्या प्रक्रियेला सुध्दा लोकशाही असेच म्हटले जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बैठका महामेळावे हे घेतले गेले तरी निवडणुकीसाठी ज्या उम...

वर्षातला सात मजली हास्यविनोद

वर्षातला सात मजली हास्यविनोद  भाजपला प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचे आहेत, आणि विरोधकांच्या रागाला कुकरच्या शिट्टी प्रमाणे काँग्रेस क्षोभाची वाफ घालवण्याकरता संसदेमध्ये पाहिजे आहे. भाजपचा हा डाव ओळखून काँग्रेसने आपली वाटचाल केली तर लोकसभेबरोबर काही राज्यात विधानसभेतही ते यशस्वी होतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वर्ष संपता संपता या वर्षातला सगळ्यात मोठा विनोद नागपूर येथील त्यांच्या भाषणात केला. भारतीय जनता पक्षामध्ये गुलामगिरी आहे. तर काँग्रेसमध्ये ही गुलामगिरी कधीच नव्हती असे वक्तव्य त्यांनी बेधडकपणे केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला हसून दाद दिल्याशिवाय विनोद समजणाऱ्याला राहता येणार नाही. खरे तर काँग्रेस पक्षाची ओळखच परिवारवादी पक्ष किंवा एककुटुंबचालकांवर्तित पक्ष म्हणून आहे. नेहरू -गांधी घराणे या पक्षाचे मालक आहेत आणि हा मालकी हक्क आजही त्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मान्य करतात यातच काँग्रेस पक्षामधील गुलामगिरीची भावना किती खोलवर रुजली आहे याचा साक्षात्कार होतो. गुलामगिरीची भावना काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या तसेच सामान्य कार्यकर्त्याच्या मनात इतकी खोलवर रुजली आहे...

अशक्त दंडातल्या बेडकीचा आक्रोश

अशक्त दंडातल्या बेडकीचा आक्रोश बाबरी मशिदीचे पतन त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ...तर मला त्याचा अभिमान आहे हे म्हणणे आणि सुंदरसिंग भंडारी यांनी ते काम शिवसेनेचे असावे असे सांगणे यातून ठोस निर्णय आणि जबाबदारी कोणीच घेतली नव्हती . भाजपनी ती घ्यायला पाहिजे होती.थोडक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी आणि शिवसेना या सगळ्यांनी मिळून केलेली ही व्युहरचना असावी. न्यायालयीन डावपेच कसे लढवायचे हा त्यामागचा विचार होता. त्यामुळे आजच्या परिस्थितीत उबाठा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी ,आम्ही बाबरी मशीद पाडली ही अशक्त दंडातील बेडकी फुगवून दाखवू नये .त्यापुढे शिवसेनेने बाबरी मशीद पाडण्यात सहयोग दाखवला असेल ही मात्र उभारण्यात त्यांनी पाठ फिरवली होती. ते त्यांच्या नआवाक्यात नव्हते हेही मान्य करायला पाहिजे. नष्ट करणाऱ्या पेक्षा निर्माण करणारा नेहमीच मोठा ठरतो. आयोध्या मध्ये होणाऱ्या होणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास हा अग्रलेख लिहीपर्यंत उद्धव ठाकरे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे प्रमुख आहेत त्यांना सोहळ्याचे निमंत्रण दिले गेलेले नव्हते. सो...

नैतिकदृष्ट्या दंडनीय

नैतिकदृष्ट्या दंडनीय  उठता बसता शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृतपणाच्या गप्पा मारणाऱ्या तमाम राजकारण्यांना ही भाषा शोभणारी तर नाहीच परंतु नैतिकतेच्या दृष्टीने ही दंडनीय आहे . शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राजाराम राऊतहा विषय लिखाण, चिंतन, मनन किंवा चर्चेचा अजिबात नाही. आम्ही कटाक्षाने या विषयावर लिहिणे टाळत असतो . मात्र 2019 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर या व्यक्तीने राज्याच्या राजकारणात ज्या प्रकारे व शैलीने धुडगूस घातला आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणाची 2019 सालानंतरची उरली सुरली नैतिकता ही दिवसेंदिवस ढासळ चालली आहे. दररोज सकाळी ठराविक तसेच आपले ऐकणाऱ्या माध्यमांसमोर येऊन तर्कशून्य आणि बेफाम, बेफाट अशी बडबड करत राहणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ते तुरुंगात होते तेवढे दिवस माध्यमांना काय ती शांतता होती. मात्र तुरुंगातून माघारी आल्यावर जो गुण त्यांनी आत्मसात केला होता, तो त्यांना गप्प बसून देत नव्हता आणि 2019 सालच्या निवडणुकीनंतर सुरू केलेली बडबड पुन्हा एकदा तेव्हापासून आजपर्यंत सुरूच आहे....